येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर ईव्ही हब होईल: मंत्री अतुल सावे , उद्योग, व्यापाराला चालना देणारे महाराष्ट्र ट्रेड फेअर प्रदर्शनाचे थाटात उदघाटन
सांजवार्ता ब्युरो Dec 19, 2025
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): छत्रपती संभाजीनगर शहर हे महत्वपूर्ण शहर आहे. आपल्याकडे डीएमआयडी आहेत. त्यात दहा वर्षीपूर्वी छोटे छोटे उद्योग होते. परंतु मोठे अँकर प्रोजेक्ट येते नव्हते. मोठे प्रोजेक्ट येण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात मोठे प्रोजेक्ट आले. टोयोटा सारखे प्रोजेक्ट आपल्या डीएमआयसित येत आहे. टोयोटा किर्लोस्कर आपल्या शहरात आले असून येणाऱ्या काळात आपले शहर ईव्ही हब मानला जाईल असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.सामाजिक भावनेतून समाजातील युवक-युवतींच्या स्वावलंबासाठी आणि महिला सक्षमीकरणा सह नवे उद्योजक घडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, जालना जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने आर. आर. केबल प्रस्तुत भव्य महाराष्ट्र ट्रेड फेअर प्रदर्शन आज सकाळी एसएफएस स्कुल च्या प्रांगणात सुरू झाले. त्याचे उद्घाटन स्व.डॉ. रामगोपाल चितलांगे सभागृहात दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी आर आर केबल चे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र काबरा तर विशेष अतिथी म्हणून विख्यात उद्योजिका तसेच समाजसेविका भगवती बलदवा, महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, दक्षिनांचल महासभेचे उपसभापती अरुण भांगडिया, संयुक्त मंत्री जुगलकिशोर लोहिया, दैनिक सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे, जालना येथील आयकॉन स्टीलचे कांतीलाल राठी, मनीष राठी, नीरज झंवर, जितेंद्र बियाणी, अलोक मुंदडा, माहेश्वरी सभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा, योगेश बजाज, युवा संघटनचे अध्यक्ष भूषण मालपाणी, दीपक तोष्णीवाल, मनीष राठी, श्यामसुंदर सोमाणी, विनीत तोष्णीवाल, भिकमचंद मल सह आदींची उपस्थिती होती. यावेळी महेशपूजन करण्यात आले.पुढे बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, मोठं मोठ्या प्रोजेक्टने आपल्या शहरात गुंतवणूक केली आहे. ऑरिक सिटीत देखील मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. त्यामुळे जवळपास ६० हजार ते ७० हजार उद्योजकांना नोकरी मिळतील. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे आपले एकमेव शहर असेल. तसेच पेट्रोल, डिझेल याची बचत करण्यासाठी इव्हेकलचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे शहर नक्कीच ईव्ही हब होईल. यामुळे शहराचा विकास होईल. आणि आजचे महाराष्ट्र ट्रेड फेअर प्रदर्शनासाठी उत्तम ठिकाण निवडले आहे. उद्योजकांना यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल. यावेळी मधुसूदन गांधी यांनी सांगितले की, मेकईन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना ठेवली आहे. त्या अंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. यावेळी समाजसेविका भगवती बलदवा यांनी सांगितले की, आजच्या महाराष्ट्र ट्रेड फेअरमधून उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. आणि यात महिलांनी २५ टक्के स्थान देण्यात आले आहे. यातून एक महिला घरसंसार सांभाळू शकते तीच महिला आज घराबाहेर येऊन उद्योग व्यवसाय देखील सांभाळत आहे. त्यांच्याशिवाय आज काहीही शक्य नाही हे यातून दाखवून दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी सत्यनारायण सारडा यांनी प्रास्तविक केले. तर सूत्रसंचालन रेखा राठी यांनी केले.एकाच छताखाली एकत्र आले राज्यभरातील दोनशे उद्योजक१९ ते २२ डिसेंबर दरम्यान सेव्हन येथील एसएफएस स्कूल च्या विस्तीर्ण प्रांगणात सकाळी १० ते रात्री ९ वाजेदरम्यान करण्यात आले असून या भव्य महाराष्ट्र ट्रेड फेअरला आजपासून सुरुवात झाली. एकाच छताखाली दोनशे स्टॉल यात भरविण्यात आले असून महिलांसाठी २५ टक्के स्टॉल ठेवण्यात आले आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. यावेळी कोल्हापूर, पुणे, गेवराई सह आदी राज्यभरातून उद्योजक एकत्र येऊन उद्योगाला प्रोत्साहन दिले.